हिंदु श्रद्धांवरील आघात थांबवण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्व सिंहभूमच्या (झारखंड) उपायुक्तांना निवेदन सादर
जमशेदपूर (झारखंड)- उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या आणि बिहारचे शिक्षणमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’विषयी अत्यंत चुकीचे वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे अशा प्रकारे सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन पूर्व सिंहभूमच्या उपायुक्त विजया जाधव यांना सादर करण्यात आले.
या वेळी श्री संकटमोचन हनुमान मंदिराचे श्री. राजन गोराई, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री चंदन दलाल, डी. प्रसाद, प्रशांत कुमार मोहंती, सुब्रतो भद्र, रवी महाराणा, धर्मप्रेमी सर्वश्री बी. व्ही. कृष्णा, सुदामा शर्मा, बी. गोपाल राव, सौ. रंजना वर्मा, तसेच समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.