शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ‘ब्ल्यू टिक’ गेले !
संकेतस्थळ बंद
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे (@ShivSena) ‘ब्ल्यू टिक’ गेले असून हँडलवर क्लिक केले की, सध्या ‘रॉक अँड रोल’ असे नाव दिसत आहे. शिवसेनेचे ShivSena.in हे अधिकृत संकेतस्थळही बंद पडले आहे.
शिवसेनेनं ट्विटरवरील अकाऊंटचं नाव बदललं #Shivsena #UddhavThackeray https://t.co/edVcMwZTvI
— Lokmat (@lokmat) February 19, 2023
आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव ShivSenaUBT असे ठेवण्यात आले असून ‘शिवसेना कम्युनिकेशन’ या हँडलचे नाव ShivsenaUBTComm असे केले आहे. ठाकरे गटाचे संकेतस्थळ सध्या बंद आहे.