अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक श्रद्धा दुखावणे अयोग्य !
रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य देण्यात आले आहे. याचा अर्थ असा नाही की, कुणाच्याही धार्मिक श्रद्धा आपण दुखाऊ शकतो. कोणत्याही धर्मग्रंथावरून वाद निर्माण करणे अयोग्य आहे. अभिनेते रजा मुराद यांनी समाजवादी पक्षाकडून रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वरील वक्तव्य केले.
रामचरितमानस पर दिए गए बयान के बाद सियासत गर्माई हुई है. इस बीच फिल्म अभिनेता रजा मुराद का भी बयान सामने आया है.#Ramcharitamanas #RazaMurad #UttarPradesh https://t.co/SRDtlbgL3q
— ABP Ganga (@AbpGanga) February 18, 2023
या प्रसंगी मुराद यांनी योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, योगी यांचे सरकार राज्यात चांगले काम करत असल्यानेच जनतेने त्यांना पुन्हा निवडून आणले.