उत्तर कोरियाने केले आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परीक्षण
प्यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाने हे घोषित केले की, त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘हावसोंग-१५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. यामागे शत्रूच्या शक्तीसमोर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करणे, हाच हेतू होता, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाने आरोप केला होता की, त्याच्या पूर्वेकडील किनार्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागले होते.
स्टेट न्यूज एजेंसी KCNA ने कहा कि बैलिस्टिक मिसाइल का परीक्षण उत्तर कोरिया के खिलाफ रणनीति बनाने वालों के विरोध की क्षमता का वास्तविक प्रमाण है.https://t.co/OmxsMhptwr
— AajTak (@aajtak) February 19, 2023
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांची बहीण किम यो जोंग हिने सांगितले की, अमेरिकेने आता लक्षात ठेवले पाहिजे. अमेरिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उत्तर कोरियाविषयी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जी कोणत्याही शत्रूनीतीपेक्षा अल्प नाही. आम्ही शत्रूच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याला त्याच्या हालचालीनुसार प्रत्युत्तर दिले जाईल.