मारहाणीचा गुन्हा नोंद असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे २७ वर्षांपासून मुंबईत अवैध वास्तव्य !
नवी मुंबई, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – एन्.आर्.आय. पोलीस ठाण्याच्या सीमेत करावे येथे रहाणारा नुरिया उपाख्य गणा बाबुल पठाण याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याच्याविषयी आतंकवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने चौकशी केली असता, तो मूळ बांगलादेशी नागरिक असून अवैधपणे भारतात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. तो आई-वडिलांच्या समवेत वर्ष १९९५ मध्ये पारपत्राविना भारतात आला होता. तेव्हापासून अद्यापपर्यंत तो जुने मच्छी मार्केट करावे परिसरात राहून भाजी आणि मासे विक्री यांचा व्यवसाय करत आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असलेले आधारकार्ड आणि पॅनकार्ड आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने हे बनवून घेतले आहे. (घुसखोराला खोटी कागदपत्रे पुरवणार्यांची आणि त्यास भारताची अधिकृत कागदपत्रे देणार्यांचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) तो बांगलादेशमधील नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.
संपादकीय भूमिका२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! |