सांगली येथे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !
सांगली – सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी ‘जिजामाता बाल मंदिर’च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाईले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद रामचंद्र फडके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर, लता देशपांडे, धनश्री शिंदे, सर्वश्री नितीन ढाले, रामचंद्र कंदी, स्वरूप वाटवे, किशोर साळुंखे, सचिन साठे, विवेक फडके उपस्थित होते.