पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन !
पुणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात तळेगाव दाभाडे, तळेगाव स्थानक, प्राधिकरण (निगडी), चिंचवड तसेच पौड रस्ता कोथरूड इत्यादी ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जिज्ञासू अन्य कक्षापेक्षा संस्थेच्या कक्षाकडे आकर्षित होत होते.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
चिंचवड
साधक ज्या ग्रंथांची माहिती सांगत होते ते ग्रंथ एक जिज्ञासू लगेच खरेदी करत होते.
तळेगाव
माजी आमदार संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे यांनी कक्षाला भेट दिली आणि ‘हलाल जिहाद’, ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हे ग्रंथ घेतले.
कोथरूड
राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष आणि माजी आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी कक्षाला भेट दिली आणि उत्सुकतेने ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली.