हिंदूंनो, वर्ष २०२५ ची महाशिवरात्र हिंदु राष्ट्रात असेल ! – ह.भ.प. संदीप मांडके, पुणे
कुडाळ – येणारा काळ हा हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल आहे. अशा वेळी आपली जात, पक्ष, पद, संघटना बाजूला ठेवून वर्ष २०२५ मध्ये येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्रासाठी आपण सर्वांनी संघटित होण्याची हीच वेळ आहे. ती वाया घालवू नका, असे आवाहन पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांनी हुमरमळा (वालावल) येथील श्री देव रामेश्वर मंदिरात आयोजित कीर्तनातून केले. श्री देव रामेश्वर मंदिरात १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत असलेल्या महाशिवरात्री उत्सवनिमित्त ह.भ.प. मांडके यांच्या कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. मांडके यांनी सांगितले की, आपण हिंदु राष्ट्रासाठी आपला वेळ दिला पाहिजे. हिंदूंनो, संघटित होऊन वर्ष २०२५ ची महाशिवरात्र हिंदु राष्ट्रात साजरी करूया.
जगातील प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे, हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा उदात्त विचार ! – ह.भ.प. संदीप मांडके
‘जगातील प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, हा उदात्त विचार मनात ठेवून भगवंताच्या अधिष्ठानाने हे राष्ट्र हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे कार्य चालू आहे. हे कार्य करणारे आणि जिज्ञासूंना, साधक अन् साधकांना संत बनवणार्या प.पू. डॉ. आठवले यांची भेट आणि दर्शन लाभले, ही आमची पूर्वपुण्याई आणि अहोभाग्य आहे. पुढे येणारा काळ आणि साधनेची दिशा यांविषयी त्यांचे मार्गदशन लाभले होते. सनातनला विरोध करणारी समाजमाध्यमे आता कुठे गेली ? सनातनचे कार्य महान आहे. तिथे स्वार्थ नाही, हे समाजाला आता समजू लागले आहे. त्यामुळे आता तरी सर्व हिंदू संघटना आणि संप्रदाय यांनी हिंदु राष्ट्रासाठी, रामराज्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थितांनी जयजयकार करून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.