१ लाखांची लाच स्वीकारतांना नागपूर येथे अभियंत्यासह तिघांना अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग !
नागपूर – शेताच्या रेखांकन संमतीच्या दृष्टीने अंतिम शिफारस पुढे पाठवण्यासाठी १ लाख १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना भंडारा येथील लाखांदुर नगरपंचायतमधील तिघांना १६ फेब्रुवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. स्थापत्य अभियंता गजानन कराड (वय २८ वर्षे), कनिष्ठ लिपिक विजय करंडेकर (वय ४० वर्षे) आणि खासगी वाहनचालक मुखरण देसाई (वय ४५ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार प्रकाश बोरकर (लाखांदूर) यांच्या मालकीची शेती आहे. त्यांनी शेतीचा विकास आणि छाननी शुल्क पावती अन् रेखांकन संमतीसाठी स्थानिक लाखांदूर नगरपंचायतीला शिफारशीसाठी संपर्क केला; मात्र काम करून देण्यासाठी १ लाख १० सहस्र रुपये लाचेची मागणी करण्यात आली. बोरकर यांनी याची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
संपादकीय भूमिकाभरघोस वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही महसूल विभागातील अभियंता, लिपिक आणि वाहनचालक लाच घेतात, याहून लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? अशा कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे ! |