निवडणूक आयोगाने मोठी चूक केली ! – कायदेतज्ञ उल्हास बापट
मुंबई – निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. या निर्णयाचे काय परिणाम होतील, या निर्णयाची लाभ-हानी किती हे काळच ठरवेल. सर्वोच्च न्यायालय कदाचित आगामी ४-५ दिवसांत आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. आता या खटल्याची सलग सुनावणी होणार आहे, असे विधान कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याचा निर्णय घोषित केल्यावर बापट यांनी वरील मत व्यक्त केले.