‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या लढाऊ विमानावर पुन्हा लावण्यात आले श्री हनुमंताचे चित्र !
बेंगळुरू – येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या ‘हवाई कवायतीं’च्या कार्यक्रमात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या अर्थात् ‘हॉल’च्या लढाऊ विमानावर पुन्हा श्री हनुमंताचे चित्र लावल्याचे दिसून आले. १३ फेब्रुवारीला झालेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी विमानावर श्री हनुमंताचे चित्र लावण्यात आले होते; परंतु काहींनी त्यावर आक्षेप घेतल्याने ते हटवण्यात आले होते. आता पुन्हा लावण्यात आलेले चित्र श्री हनुमान हातात गदा घेऊन उड्डाण करत असल्याचे आहे. या चित्राखाली ‘द स्टॉर्म इज कमिंग’ (वादळ येत आहे) असे लिहिले आहे.
Aero India 2023: HLFT-42 विमान पर फिर दिखाई दिए ‘बजरंगबली’, HAL ने पहले हटा दी थी तस्वीर#AeroIndia2023 #HLFT42 #LordHanumanhttps://t.co/pVpvlgCcy5
— Amar Ujala (@AmarUjalaNews) February 17, 2023