हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा ! – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचा ऑस्ट्रेलिया दौरा
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील भारतियांनी ‘जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियात हिंदूंची मंदिरे आणि भारतीय नागरिक यांच्यावर होणार्या आक्रमणांच्या प्रकरणी ऑस्ट्रेलिया सरकारला संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास सांगावे’, अशी मागणी केली. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर आक्रमणे होत आहे.
जयशंकर का ऑस्ट्रेलिया दौरा: मंदिरों पर खालिस्तान समर्थकों के हमलों से डरा हिंदू समुदाय, की यह मांग#Australia #SJaishankar #HinduTemples #MEA #KhalistanSeparatisthttps://t.co/qksHslxz7e
— Amar Ujala (@AmarUjalaNews) February 18, 2023
या संदर्भात काही भारतियांनी सांगितले की, आम्ही आशा करतो की, ऑस्ट्रेलिया सरकार भारतियांवर आक्रमण करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करील. आम्ही हिंदू आहोत आणि आमची हिंदु संस्कृती आहे. हिंदुत्व ही जीवन जगण्याची पद्धत आहे. आम्ही सर्व धर्मांचा मान राखतो.