रमेश बैस यांनी मराठीतून घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ !
मुंबई – महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी राज्यपालपदाची शपथ मराठीतून घेतली. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला.
रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ #maharashtra #maharashtra #governorrameshbais #oathhttps://t.co/UAPM0bUps8
— ABP माझा (@abpmajhatv) February 18, 2023
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.