जिवे मारण्याची भीती दाखवून मतिमंद युवतीवर अत्याचार !
सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – जिवे मारण्याची भीती दाखवून एका मतिमंद युवतीवर अत्याचार केल्याची घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. याविषयी बोरगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय मतिमंद आणि भोळसट स्वभावाच्या मुलीवर नागठाणे येथील शिवनाथ परशुराम साळुंखे याने स्वत:च्या भ्रमणभाषच्या दुकानात नेऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केले होते. (अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! – संपादक) तब्येतीच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या आईने सातारा जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीची पडताळणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना १४ फेब्रुवारी या दिवशी उघड होऊनही अद्यापपर्यंत शिवनाथ साळुंखे याला अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकासमाजाची वासनांध मानसिकता पालटण्यासाठी महिलांवर अत्याचार करणार्या प्रत्येकाला कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे ! |