पुणे येथील शेतीपंपधारकांच्या वीजदेयकांची थकबाकी ७३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक !
पुणे – ‘महावितरण’च्या वीजग्राहकांच्या देयकांची थकबाकी ७३ सहस्र ३६१ कोटी रुपयांवर पोचली आहे. यामध्ये सवलतीच्या दरात वीजपुरवठा घेणार्या १५ लाख १९ सहस्र शेतीपंपधारक ग्राहकांनी मागील ५ वर्षांपासून एकदाही वीजदेयक भरलेले नसून त्यांच्याकडे २१ सहस्र ६७ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे, तर ३ लाख २३ सहस्र शेतीपंपधारकांनी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ एकही वीजदेयकाचा भरणा केला नसून त्यांच्याकडे ५ सहस्र २१६ कोटी रुपये थकित आहेत.‘महावितरण’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली, तसेच ‘घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि शेतीपंपधारक ग्राहकांनी वीजदेयक भरून सहकार्य करावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्या महावितरण विभागाचा कारभार कसा चालतो, हे लक्षात येते. वीजदेयक न भरताही विज मिळते, अशी सवय ग्राहकांना लावणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |