राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत !
ठाणे – महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकावर आक्रमण करणे, तसेच शस्त्रास्त्र कायद्याविषयीची कलमे दाखल करण्यात आली होती; पण आता जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत झाला आहे.