परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या त्यांच्या ‘रथोत्सव’ सोहळ्याच्या वेळी पूर्ण होणे
‘अनेक साधकांना मला पहाण्याची इच्छा होती; मात्र माझी प्राणशक्ती न्यून असल्यामुळे मी खोलीच्या बाहेरही पडू शकत नाही. ‘साधकांची मला पहाण्याची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी महर्षींनी माझा ‘रथोत्सव’ करण्यास सांगितले’, हे माझ्या लक्षात आले.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मी साधना करायला लागल्यापासून मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. मला साधना करायला घरून विरोध आहे. मी माझ्या कामाच्या ठिकाणी जातांना-येतांना मुद्दामहून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या समोरून जायचे. मी आश्रमासमोर उभी राहून प्रार्थना करायचे. त्या वेळी ‘गुरुदेव दिसतील’, असे मला वाटायचे.
महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘रथोत्सव’ सोहळा साजरा झाला. माझे महत्भाग्य की, गुरुदेवांचा ‘रथोत्सव’ सोहळा मला प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे प्रथमच दर्शन झाले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.’
– एक साधिका, फोंडा, गोवा. (७.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |