जागतिक स्तरावर भारताची सर्वांत मोठी आणि गतीशील आर्थिक वृद्धी निश्चित होणार !
जागतिक सरकार शिखर परिषदेत प्रसिद्ध अमेरिकी अब्जाधीश रे डालियो यांनी केले भारताचे कौतुक !
दुबई (संयुक्त अरब अमिरात) – येणार्या काळात भारत सर्वांत मोठी आणि गतीशील आर्थिक वृद्धी करील. गेल्या १० वर्षांचे अध्ययन केले, तर असे चित्र समोर येते की, भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध अब्जाधीश, गुंतवणूकदार आणि लेखक रे डालियो यांनी केले. ते येथे चालू असलेल्या जागतिक सरकार शिखर परिषदेला संबोधित करत होते.
इस अमेरिकी अरबपति ने भारत को लेकर कही बड़ी बात, ‘चीन से कहीं आगे निकलेगा देश’#america #china #Indiahttps://t.co/axhR06oEFb
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) February 17, 2023
डालियो म्हणाले की, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक गतीने मोठे पालट झाले आहेत. अजूनही असे पालट गतीने होत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील शक्ती संघर्षाच्या काळामध्ये भारताला त्याच्या तटस्थ भूमिकेचा लाभच होणार आहे.
संपादकीय भूमिकारे डालियो यांना आता कुणा धर्मनिरपेक्ष उपटसुंभाने ‘भाजपचा एजंट’ म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको ! |