अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्याशी विवाह !
‘लव्ह जिहाद’ असल्याची सामाजिक माध्यमांतून टीका !
मुंबई – सातत्याने हिंदु धर्माविरोधी वक्तव्ये करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह (कोर्ट मॅरेज) केला आहे. यावरून नेटकर्यांनी (सामाजिक प्रसारमाध्यमांवर सक्रीय असणार्यांनी) हा ‘लव्ह जिहाद’ असल्याची टीका केली आहे. अनेक नेटकर्यांनी यामुळेच स्वरा भास्कर सातत्याने हिंदु धर्माविरोधात टीका करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
बॉलीवुड एक्ट्रेस स्वरा भास्कर ने एक्टिविस्ट फबद अहमद से शादी रचा ली है. एक्ट्रेस ने फहद के संग प्यार की कहानी को बताते हुए एक वीडियो सोशल मीडिया पर शेयर किया है. #SwaraBhaskar #SwaraBhaskerWedding https://t.co/8AtqWthp7C
— ABP News (@ABPNews) February 16, 2023
याविषयी स्वरा भास्कर यांनी स्वत:च्या ‘ट्विटर’ खात्यावरून विवाह केल्याच्या माहितीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. एका नेटकर्याने ‘आता लक्षात आले हिंदु धर्माविषयी लाज का वाटत होती ?’, ‘स्वरा भास्कर हिच्या विचारधारेचा नवरा मिळाला. आता तू भारत आणि हिंदु धर्म यांना विरोध करत बस’, ‘हे तर होणारच होते’, ‘म्हणूनच या लोकांचा पुळका होता’, ‘तुकडे तुकडे गँग’ अशा प्रतिक्रिया नेटकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.