नृत्य कलेतून भगवंताला अनुभवूया !
नटराज हे भगवान शिवाचे एक रूप कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. भगवान शिवाचे तांडव नृत्य हे प्रसिद्ध आहे. नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून भगवान शिवाची अनुभूती कशी घेता येईल, हे या विशेषांकाच्या निमित्ताने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यातून ‘आध्यात्मिक स्तरावर कला अनुभवता यावी आणि कलेकडे साधनेचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित व्हावी’, ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना !