मंदिरात भारतीय शास्त्रीय नृत्य केल्यावर मंदिरातील सात्त्विकतेच्या परिणामाविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने केलेले संशोधन !
मंदिरात भारतीय शास्त्रीय नृत्य केल्यावर कलाकार आणि सहभागी घटक यांच्यावर होणार्या मंदिरातील सात्त्विकतेच्या परिणामाविषयी तांबडीसुर्ला (गोवा) येथील शिवमंदिरामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने केलेले संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘पूर्वकालापासून गायन, वादन आणि नृत्य यांच्या प्रसारासाठी मंदिर हे एक उत्तम माध्यम बनले आहे. मंदिरातील सात्त्विक वातावरणामुळे कलाकाराने केलेल्या कलेच्या प्रस्तुतीतून मंदिरात आलेल्या भक्तगण श्रोत्यांना उच्च स्वरूपाची आध्यात्मिक अनुभूती सहजतेने येते. गायन, वादन आणि नृत्य यांची निर्मिती भगवंताने केली आहे. या कला त्याच्या आराधनेचे एक माध्यम आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘मंदिरातील सात्त्विकतेचा कलाकारावर कसा परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी तांबडीसुर्ला (गोवा) येथील शिवमंदिरात ‘शिवाच्या पिंडीसमोर नृत्य केल्यावर कलाकारांच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण वापरण्यात आले. (या उपकरणाच्या माध्यमातून प्रयोगात सहभागी झालेल्या घटकांची (व्यक्ती, वस्तू, झाडे इत्यादींची) सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येते.)
१. तांबडीसुर्ला (गोवा) येथील शिवमंदिरामध्ये नृत्यांशी संबंधित केलेले संशोधन !
१ अ. वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेली चाचणी : ४.९.२०२२ या दिवशी तांबडीसुर्ला (गोवा) येथील शिवमंदिरात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम् नृत्य कलाकार, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (कथ्थक नृत्य कलाकार, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) या साधिकांनी प्रत्येकी ५ – ७ मिनिटांचे नृत्य केले. या नृत्याच्या प्रस्तुतीपूर्वी आणि नंतर नृत्य कलाकार अन् त्यांनी नृत्याच्या वेळी वापरलेले घुंगरू, प्रेक्षक, मंदिरातील शिवपिंडी आणि नृत्याच्या वेळी त्या ठिकाणी ठेवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार बनवलेले शिवाचे सात्त्विक चित्र, यांच्या प्रभावळीवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. उदाहरण म्हणून कथ्थक नृत्य सादर करणारी साधिका कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिच्या नृत्याच्या प्रस्तुतीनंतर केलेले परीक्षण येथे दिले आहे.
१ आ. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने केलेल्या कथ्थक नृत्याचा कु. शर्वरी, तिने वापरलेले घुंगरू, शिवाचे सात्त्विक चित्र, मंदिरातील शिवपिंडी आणि प्रेक्षक यांचे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेले परीक्षण !
वरीलप्रमाणे सकारात्मक परिणाम उपस्थित अन्य कलाकार साधिका आणि प्रेक्षक यांच्या संदर्भातही अभ्यासला आहे; परंतु सर्व निरीक्षणे येथे दिली नाहीत.) |
१ इ. निष्कर्ष : ‘केवळ ५ – ७ मिनिटे कालावधीच्या नृत्याने कलाकारांच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये एवढी वाढ होणे’, हा मंदिरातील ‘सात्त्विक वातावरण आणि कलाकाराचे भावपूर्ण सादरीकरण’, यांचा परिणाम आहे. ‘अल्प कालावधीत शिवाच्या पिंडीतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे’, यातून ‘कलेच्या भावपूर्ण प्रस्तुतीमुळे शिवाचे (देवतेचे) तत्त्व अधिक कार्यरत झाले’, हेे लक्षात आलेे. ‘कलेचे सादरीकरण जेवढे भावपूर्ण होते, तेवढे तिथे त्या देवतेची ऊर्जाही कार्यरत होऊन भावपूर्णरित्या सादर केलेल्या कलेला देवतेचे आशीर्वाद मिळतात’, असेे लक्षात आले.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकरया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. या संशोधनाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य प्रस्तुत करणार्या साधिकांना आलेल्या अनुभूती
२ अ. नृत्यापूर्वी शिवपिंडीकडे पहातांना भावजागृती होऊन ‘शिवपिंडी जागृत झाली आहे’, असे जाणवणे आणि नृत्यानंतर ‘थंड लहरी येत असून वातावरणातील चैतन्य वाढले आहे’, असे जाणवणे : ‘मंदिरातील शिवपिंडी पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला सूक्ष्मातून शिवाचा आवाज ऐकू आला, ‘तू नारायणाकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आश्रमातून) आली आहेस ना ? मी तुझे नृत्य पहाण्यासाठी उत्सुक आहे.’ तेव्हा ‘ती शिवपिंडी जागृत झाली आहे’, असे मला वाटले. शिवपिंडीला नमस्कार करतांना ‘मी शिवमय झाले आहे’, असे मला जाणवलेे. नृत्य करतांना मला सूक्ष्मातून शिवलोकाचे वायूमंडल दिसले आणि ‘माझ्या दिशेने थंड लहरी येत आहेत’, असे जाणवले. नृत्य झाल्यानंतर ‘वातावरण स्तब्ध झालेे असून तेथील चैतन्य वाढले आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे)
२ आ. नृत्य करतांना ‘मंदिराभोवती असलेली शिवपिंडीची प्रभावळ वाढत आहे’, असे दिसून ‘ॐ’चा नामजप आपोआप चालू होणे : ‘नृत्य करतांना मला वातावरणात थंडावा जाणवत होता. मला मंदिराच्या भोवती मोठी प्रभावळ दिसली. ती प्रभावळ मंदिरात असलेल्या शिवपिंडीची असून ‘ती हळूहळू वाढत आहे’, असे मला जाणवले. नृत्य करतांना मला शिवपिंडीतील चैतन्य ग्रहण करता येत होते. नृत्य करतांना मला माझ्या डोळ्यांसमोर भगवान शिवाचे ध्यानस्थ रूप दिसले आणि माझा ‘ॐ’ हा नामजप आपोआप चालू झाला. ‘मी ही नृत्यसेवा एका बिल्वपत्राच्या रूपात भगवान शिवाच्या चरणी अर्पण करत आहे’, असे मला जाणवले.’ – कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे)
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१.२०२३)
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘भारतीय विद्या भवन (देहली)’ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये ‘संगीत आणि नृत्य यांचे उगमस्थान असलेल्या भारतीय मंदिरांचे महत्त्व’ हा विषय प्रस्तुत करणे‘भारतीय विद्या भवन (देहली)’ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये (टीप) ‘संगीत आणि नृत्य यांचे उगमस्थान असलेल्या भारतीय मंदिरांचे महत्त्व’, हा विषय महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी प्रस्तुत केला. त्यातील संशोधनाचा एक भाग या ठिकाणी दिला आहे. टीप – माहितीजालावर (इंटरनेटवर) होणारी ‘ऑनलाईन’ बैठक’ – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१.२०२३) |