पुणे येथील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम !
पुणे – कोयते उगारून दहशत निर्माण करणे, दुचाकीवरून येत सोनसाखळी चोरी, हत्या, घरफोडी अशा गुन्ह्यांना लगाम लावण्यासाठी शहरातील १० सहस्र ९७३ गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोयता गँगच्या दहशतीच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी ही उपाययोजना केली. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गंभीर गुन्हे करणार्या शहरातील ३० सहस्र गुन्हेगारांची यादी पोलिसांनी सिद्ध केली आहे. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.
शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून १२ टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.