कराड येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक हस्तगत !
कराड, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मालखेड गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क सातारा विभागाच्या भरारी पथकाने नूडल्सच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून विदेशी दारूच्या बाटल्या, आयशर ट्रक, भ्रमणभाष असा ५२ लाख ७३ सहस्र ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Goa Liquor : नूडल्सच्या नावावर दारुची तस्करी; कराडात Excise चा छापा; साठ लाखांच्या बाटल्या जप्त #saamtvnews #saamdigital #goa #karad #excise #liquorhttps://t.co/BFGFQDDWSo
— SaamTV News (@saamTVnews) February 14, 2023
या प्रकरणी ट्रकचालकास कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण बिरादार, एन्.पी. क्षीरसागर, साहाय्यक निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव यांनी सहभाग घेतला.