द्रमुकचे नगरसेवक आणि त्यांचे साथीदार यांच्या मारहाणीत सैनिकाचा मृत्यू
६ जणांना अटक, तर नगरसेवक पसार !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)
कृष्णगिरी (तमिळनाडू) – येथे कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचे नगरसवेक चिन्नासामी आणि त्यांचे साथीदार यांनी प्रभाकरन् या भारतीय सैनिकाची मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर नगरसेवक पसार झाले आहेत. पोचमपल्ली गावात प्रभाकरन् यांचे चिन्नासामी यांच्याशी त्यांच्या घराजवळच्या पाण्याच्या टाकीवर कपडे धुण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर चिन्नासामी यांनी ९ जणांना समवेत घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी प्रभाकरन् आणि त्यांचा भाऊ प्रभु या दोघांना मारहाण केली होती. यात प्रभाकरन् घायाळ झाले होते. नंतर त्यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.
छुट्टी पर गाँव आए थे भारतीय सेना के जवान प्रभु, DMK पार्षद और उसके साथियों ने पीट-पीटकर मार डाला: तमिलनाडु की घटना#TamilNadu https://t.co/QzpbdoleIq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 16, 2023
अण्णाद्रमुकचे (अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचे) प्रवक्ते कोवई साथ्यन म्हणाले की, भारतीय सैनिकाच्या हत्येच्या घटनेवरून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे की, द्रमुख पक्ष सत्तेत असल्यावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सैनिकाची हत्या करेपर्यंत यांची मजल गेली आहे. अण्णाद्रमुक आणि इतर विरोधी पक्ष यांचा सूड घेण्यासाठी पोलिसांना हाताशी धरले जात आहे.
संपादकीय भूमिकासत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या या कृत्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी असणार्या द्रमुकवर बंदीच घातली पाहिजे ! |