नवी मुंबई महापालिकेच्या ‘पे आणि पार्किंग’च्या कामावर देखरेखीसाठी भरारी पथक !
नवी मुंबई – महापालिकेच्या ‘पे आणि पार्किंग’च्या कामाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने कामावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
अतिरिक्त पार्किंग शुल्क घेणे, पार्किंगच्या जागेत एखाद्या आस्थापनाच्या गाड्या सतत पार्क करणे, त्याच ठिकाणी रिसेलच्या गाड्या विक्रीसाठी ठेवणे, पार्किंग शुल्क देण्यावरून नागरिकांशी भांडणे, ठराविक गाड्यांना मासिक पास देणे, जनतेला पार्किंगसाठी जागा न देता शोरूमच्या गाड्यांना जागा देणे, नागरिकांनी पार्किंगचे शुल्क देण्यास विरोध करणे, याविषयी खोट्या तक्रारी करणे असे अनेक प्रकार घडले आहेत. हे टाळण्यासाठी पथक नेमण्यात आले असून प्रत्येक विभागाचा साहाय्यक आयुक्त हा पथक प्रमुख असेल. वरिष्ठ लिपिक आणि लिपिक यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे. यामुळे पार्किंगच्या कामातील मनमानीला आळा बसण्यास साहाय्य होईल.