वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आचरण करून आरोग्य कसे सांभाळावे ?
‘सध्या वातावरणातील थंडी अल्प होऊन दुपारनंतर गरम होण्यास आरंभ झाला आहे. जेव्हा गरम होते तेव्हा काही जण गार पाणी, सरबते, आईस्क्रीम, ऊसाचा रस, फळे आणि त्यांचे रस इत्यादी थंड पदार्थ घेतांना आढळतात; परंतु अजून थंडी पूर्णतः गेलेली नाही.
हिवाळा संपून उन्हाळा चालू होण्यापूर्वी वसंत ऋतू असतो तेव्हा या ऋतुसंधीच्या कालावधीमध्ये अनेकांना सर्दी, खोकला, ताप येणे असे अनेक विकार होतात.
असे विकार होऊ नयेत; म्हणून थंड पदार्थ घेणे टाळायला हवेत. पाणी प्यायचे असल्यास गरम प्यावे, तसेच अधिक पाणी पिऊ नये.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (६.२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)