आदिवासींमध्ये निकोपता निर्माण करणार्या वैशिष्ट्यपूर्ण ‘गोठूल’ सामाजिक संस्थेची ब्रिटिशांनी तोडमोड करणे !
‘ब्रिटिशांनी आदिवासी भागातील ‘गोठूल’ ही सामाजिक संस्था उखडून काढली. पूर्वीच्या काळी प्रत्येक आदिवासी गावात गोठूल असे. जिथे गावातील १५ ते २२ वर्षाची मुले आणि मुली एकत्र रहात, खेळत आणि स्वयंपाक करत. खेळता-खेळता त्यांचा स्वभाव आणि आवडी-निवडी यांविषयी माहिती होत असे. मग असेच एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी ही मुले-मुली आपला जोडीदार विधीवत् निवडत असत. छोट्या वयातील मुले आणि मुली एकत्र खेळले-बागडले असल्याने समाजात एक निकोपता राहिली अन् ती निकोपता आदिवासी समाजाचे अंगभूत वैशिष्ट्ये बनली. ब्रिटिशांना गोठूल ही आदिवासींची एक अनैतिक संस्था वाटली आणि मग ब्रिटिशांनी ती तोडून-मोडून काढली. नंतर मग ब्रिटीश समाजशास्त्रज्ञांनीच ती चूक असल्याचे मान्य केले.’
लेखक : श्री. अनिल शिढोरे (साभार : ‘कालनिर्णय सांस्कृतिक’, दिवाळी २०१३)