आतापासून पावसाळा चालू होईपर्यंत नियमित दही खाणे टाळावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५४
‘वसंत, ग्रीष्म आणि शरद हे ३ ऋतू, म्हणजे वर्षातून ६ मास (साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर अन् ऑक्टोबर) दही खाऊ नये’, असे आयुर्वेद सांगतो. पावसाळा आणि थंडी या दिवसांतच दही खाता येते. आता थंडी संपून वसंत ऋतू चालू झाला आहे. त्यामुळे दही खाणे बंद करावे. दही घुसळून केलेले ताक प्यायल्यास चालते. ते अपायकारक नाही.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२३)
या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या !
आयुर्वेदाविषयी शंका ayurved.sevak@gmail.com मेल करा !