पुणे येथील संत साई हायस्कूल येथे पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा !
पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता) – पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाऐवजी युवा पिढीमध्ये स्वत:च्या आई-वडिलांविषयी आदरभाव वृद्धींगत व्हावा, यासाठी संत साई हायस्कूल, भोसरी येथे १४ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यात आला. या वेळी ७० पालक उपस्थित होते. या शाळेचे संस्थापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर हे गेल्या अनेक दिवसांपासून आध्यात्मिक कार्यावर भर देऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुसंस्कारी आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करून या शाळेने इतरांपुढे आदर्श उभा केला आहे. सकाळी ॐ चा जप करून घेणे, गायत्री मंत्राचे पठण करणे आणि अन्य वेळी पण हिंदु संस्कृतीनुसार प्रत्येक कृती करणे यांसाठी त्यांची आग्रही भूमिका असते. (हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याची श्री. ढवळेश्वर यांची कृती अभिनंदनीय आहे ! त्यांचे अनुकरण इतर शाळांनी केल्यास विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्यास साहाय्य होईल ! – संपादक)
संपादकीय भूमिकाइंग्रजी माध्यमाच्या शाळेत हिंदु संस्कृतीची जोपासना केली जाणे हे स्तुत्य ! |