पोर्तुगालच्या चर्चमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांचे पाद्रयांकडून लैंगिक शोषण !
आरोपी असणारे १०० हून अधिक पाद्री अद्यापही पदावर कायम !
लिस्बन (पोर्तुगाल) – पोर्तुगालमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील १०० हून अधिक आरोपी असणारे पाद्री चर्चमध्ये अद्यापही सक्रीय आहेत. या प्रकरणांची चौकशी करणार्या आयोगाने ही माहिती दिली आहे.
१. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आयोगाच्या अंतिम अहवालात म्हटले आहे की, पोर्तुगालमधील रोमन कॅथॉलिक चर्चच्या सदस्यांनी (यात ७० हून पाद्रयांचा समावेश आहे) कमीतकमी ४ सहस्र ८१५ मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. आयोगाने याला ‘हिमनगाचे टोक’ असे म्हटले आहे. यावरून ही संख्या अधिक असू शकते, हे लक्षात येते.
#UPDATE Catholic clergy in Portugal have abused nearly 5,000 children since 1950, an independent commission said on Monday after hearing hundreds of victims' accounts ▶️ https://t.co/qXfcuLDYMZ
📷 Child psychiatrist Pedro Strecht (C) presents the commission's findings in Lisbon pic.twitter.com/Tfy8CLsW89
— AFP News Agency (@AFP) February 13, 2023
२. आयोगाचे नेतृत्व करणारे बाल मनोचिकित्सक पेड्रो स्ट्रेच यांनी सांगितले की, ही अंदाजित पाद्रयांची संख्या आहे. ती १०० हून अधिकही असेल. या पाद्रयांची सूची बनवून ती चर्च आणि खटल्यातील फिर्यादी यांना पाठवण्याचे काम चालू आहे. अशा आरोपींना त्यांच्या कामावरून काढून टाकण्याची आवश्यकता आहे. तसेच कमीतकमी त्यांचा मुलांशी येणारा संपर्क रोखला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी करणार्या अधिकार्यांना साहाय्य करणे हे चर्चचे नैतिक कर्तव्य आहे.
Abuse Documentary : The Shame of the Catholic Church | Retro Report | The New York Times
(Source : The New York Times)
३. बिशप परिषदेचे प्रमुख जोस ओरनेलस् यांनी सांगितले की, आयोगाकडून आम्हाला अद्याप सूची मिळालेली नाही. चर्च स्वतःहून आमच्या सदस्यांची चौकशी करणार नाही. (जर चर्चची अशी भूमिका असेल, तर आरोपींना कधीतरी शिक्षा होईल का ? ही भूमिका म्हणजे वासनांध पाद्रयांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक)
४. ‘सर्व्हाइव्हर्स नेटवर्क ऑफ द ॲब्यूज्ड बाय प्रीस्ट्स’ या संघटनेने ‘पोर्तुगालमधील चर्चच्या अधिकार्यांनी आरोपी पाद्रयांची नावे, छायाचित्रे, पत्ते आदी सार्वजनिक केले पाहिजेत. तसेच त्यांना पाद्री पदावरून हटवले पाहिजे. त्यासाठी वरिष्ठांना पालटण्याची आवश्यकता आहे. त्याखेरीज या गोष्टी होणार नाहीत’, असे म्हटले आहे.
Child abuse found in Portugal Catholic Church is ‘tip of iceberg’, commission says https://t.co/bS4cwVhHWv pic.twitter.com/mtjaSI20Hh
— Reuters (@Reuters) February 13, 2023
पोर्तुगालचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची टीका !
- पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण समाजाला चकीत केलेले आहे. या प्रकरणी न्यायमंत्री आणि अन्य सरकारी अधिकारी चौकशी आयोगाची भेट घेतील.
- पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा म्हणाले की, या प्रकरणी चर्चलाही उत्तरदायी ठरवले पाहिजे.
संपादकीय भूमिका
|