कोईम्बतूर बाँबस्फोटाच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांत ६० ठिकाणी धाडी !
इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर धाडी !
नवी देहली – तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील चारचाकीमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांतील ६० ठिकाणी धाडी टाकल्या. इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या. कर्नाटकात एकूण ४५ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.
तमिलनाडु, कर्नाटक और तेलंगाना में 60+ ठिकानों पर NIA की छापेमारी: कोयंबटूर में मंदिर के सामने हुआ था ब्लास्ट, ISIS से जुड़ा था कनेक्शन#NIA #CoimbatoreBlast #Karnatakahttps://t.co/ZFxnazkNaz
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 15, 2023
२३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी कोईम्बतूरच्या संगमेश्वर मंदिराजवळ उभ्या असलेल्या चारचाकीमध्ये स्फोट झाला होता. त्यात चारचाकीचा मालक जेमिशा मुबीन यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. महंमद थलका, महंमद असरुद्दीन, महंमद रियाझ, फिरोज इस्माईल आणि महंमद नवाज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.