ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !
गोवा सरकारने याची त्वरित चौकशी करून मद्याचे दुकान बंद करायला हवे !
पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या (गडाच्या) संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग्वाद किल्ला हा गोवा मुक्तीलढ्याचा एक साक्षीदार आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आग्वाद किल्ल्यात कारावासाची शिक्षा भोगली आहे, तर शिक्षा भोगतांना अनेकांचे प्राणही गेले आहेत. अशा ऐतिहासिक किल्ल्याचे गोवा सरकारने संग्रहालयात रूपांतर केले आहे. या संग्रहालयामध्ये आता मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आले आहे. आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनीही टीका केली आहे.