परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवांशी महेश घिसे (वय ८ वर्षे) !
केवळ ८ वर्षे वयाची कु. देवांशी घिसे, भावपूर्ण असा सुंदर लेख लिहू शकते, हे कुणाला खरेच वाटणार नाही. अशा देवांशीचे कौतुक करावे तेवढे थोडे ! ‘तिची प्रगती अशीच जलद गतीने होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले ॐ |
१. गुरुदेवांमध्ये सर्व नाती अनुभवणारी देवांशी !
हे गुरुदेवा, तुम्ही मला भरभरून देता. तुम्ही माझे माता-पिता, बंधु आणि सखा आहात.
२. स्वतःला गुरुदेव घडवत असल्याविषयी देवांशीला जाणवलेली सूत्रे
आमच्यात स्वभावदोष आणि अहंचे पैलू असले, तरीही तुम्ही आम्हाला जवळ करता. मी वेळ वाया घालवत असल्यास तुम्ही कुणाच्या तरी माध्यमातून मला त्याची जाणीव करून देता. तुम्ही मला प्रतिदिन सूक्ष्मातून काहीना काही शिकवत असता. माझी चूक झाल्यावरही तुम्ही मला जाणीव करून देता.
३. देवांशी अनुभवत असलेली गुरुदेवांची प्रीती !
अ. मी साधनेचे चांगले प्रयत्न केले की, तुम्हाला आनंद होतो. मी दिवसभरात करत असलेले साधनेचे प्रयत्न तुम्ही सूक्ष्मातून पहाता.
आ. तुम्हाला माझी आठवण येते, त्याच वेळी ‘मलाही तुमची आठवण येते’, असे मला जाणवते.
इ. मी तुमच्याकडे काहीही मागितले नाही, तरी तुम्ही मला सर्व देता. तुम्हीच माझ्या इच्छा पूर्ण करता.
४. प्रार्थना
तुम्ही सतत माझा हात माझी प्रगती होण्यासाठी धरला आहे. तुम्ही माझा हात अखेरपर्यंत सोडू नका.
५. कृतज्ञता
मी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेव, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. देवांशी महेश घिसे (वय ८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२८.१०.२०२२)
|