भगवान शिव आणि नऊ नाग यांच्याविषयी श्री. साईदीपक गोपीनाथ यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने…
‘ऑनलाईन’ नामजप सत्संगात भगवान शिव आणि नऊ नाग यांच्याविषयीची माहिती ऐकायला मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटणे आणि स्वतःच्या गळ्याभोवती नागाची हालचाल जाणवून ‘विशुद्धचक्रावर आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवणे
‘१२.८.२०२१ या दिवशी सकाळी मी सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेला नामजप सत्संग ‘ऑनलाईन’ ऐकत होतो. त्या वेळी माझा नामजपही चालू होता. या वेळी सत्संगात सद्गुरु जाधवकाका ‘भगवान शिव आणि नऊ नाग’ यांच्याविषयी माहिती सांगत होते. ‘भगवान शिव आणि नऊ नाग’ यांविषयीची माहिती समजल्यामुळे मला कृतज्ञता वाटत होती.
त्या वेळी मी भगवान शिवाला प्रार्थना केली, ‘मला भगवान शिव आणि नवनाग यांच्यातील देवत्वाचा अनुभव घेता येऊ दे.’ त्यानंतर अकस्मात् ‘माझ्या गळ्याभोवती काहीतरी फिरत आहे’, असे मला जाणवले. मला वाटले, ‘तो भगवान शिवाच्या गळ्यातील नाग असावा.’ तो नाग मला ‘निर्भय रहा’, असे सांगत असल्याचे ऐकू आले. त्या वेळी मला ‘माझ्या गळ्यावर (विशुद्धचक्रावर) आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवले. त्यानंतर ‘माझा नामजप मणिपूर चक्रातून होत आहे’, असे मला जाणवले. मला या दैवी अनुभूतीचा आनंद घेता आला.
मी प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. साईदीपक गोपीनाथ, केरळ (१७.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |