वाहतूक पोलीस हवालदाराला १ किमी फरफटत नेणार्या चालकावर गुन्हा नोंद !
पालघर येथील धक्कादायक घटना !
पालघर – येथे एका चारचाकी चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराला गाडीच्या बोनेटवर १ किमीपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर चालकाला अटक करण्यात आली. चालकाकडे वैध परवाना नसल्याने त्याने पळ काढला होता; पण त्याला अटक केली असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. (केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी ! – संपादक)
महाराष्ट्र के पालघर में कार सवार ने ट्रैफ़िक पुलिसकर्मी को घसीटा, कार के बोनट पर 1 कि.मी. तक घसीटा.#MaharashtraNews #Palghar #TrafficPolice #ViralVideo pic.twitter.com/CchTmrO5PF
— News18 India (@News18India) February 14, 2023
संबंधित चालकाचे वय १९ वर्षे आहे. सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक पोलीस हवालदाराने गाडीसमोर येऊन वाहन थांबवण्यास सांगितले; मात्र चालकाने वाहन न थांबवता हवालदाराला धडक दिली. त्यामुळे हवालदार घायाळ होऊन गाडीच्या बोनेटवर पडला. तरीही चालकाने गाडी न थांबवता तो १ किमी तशीच चालवत राहिला. नंतर त्याने हवालदाराला मारहाणही केली.
संपादकीय भूमिकावाहनचालकांचा असा उद्दामपणा रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा का नाही ? |