अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठातील गोळीबारांत ३ जण ठार
मिशिगन (अमेरिका) – येथील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये गोळीबाराच्या २ घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ३ जण ठार झाले असून किमान ५ विद्यार्थी घायाळ झाले आहेत. या वेळी गोळीबार करणार्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे. या विद्यापिठाच्या बर्क हॉल आणि आय.एम्. ईस्ट सेंटर येथे या घटना घडल्या. या २ ठिकाणांमधील अंतर साधारण दीड कीलोमीटर आहे. या गोळीबारामागील कारण समजू शकलेले नाही.
BREAKING: At least 5 people injured at 2 shooting locations on Michigan State University’s campus; some victims have life-threatening injuries; suspect is at large and surveillance video is expected to be released shortly, police say. https://t.co/w88b2QCyhi pic.twitter.com/qOemFbF4jS
— NBC News (@NBCNews) February 14, 2023
संपादकीय भूमिका‘अमेरिकेसारख्या प्रगत समाजामध्ये गोळीबाराच्या घटना वारंवार का घडतात ?’, याचा विचार समाजशास्त्रज्ञ करतील का ? |