‘सरकारी कार्यालयांत भ्रष्टाचार करतांना सात्त्विक आणि आध्यात्मिक शब्दांचा उपयोग केला जातो’, यांसंदर्भातील काही उदाहरणे !
‘मी जानेवारी २०२३ मध्ये एका कामानिमित्त नाशिक जिल्ह्यात गेलो होतो. तेथे माझी ओळख भूमीची खरेदी-विक्री करणार्या एका दलालाशी झाली. त्याने ‘सरकारी कार्यालयांत भ्रष्टाचार करतांना सात्त्विक आणि आध्यात्मिक शब्दांचा उपयोग कसा केला जातो ?’, यांविषयीची काही सूत्रे मला सांगितली. ती पुढे दिली आहेत.
१. लोकांची भूमीच्या संदर्भातील कुठलीही कामे सरकारी नियमांऐवजी तलाठ्याच्या मर्जीवर चालतात. त्यामुळे तलाठ्याला ‘ब्रह्मदेव’, असे म्हणतात.
२. सरकारी अधिकारी लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी त्यांची कामे अडवून ठेवतात. ही कामे मार्गी लावण्यासाठी लोक सरकारी अधिकार्याला, ‘‘तुमची ‘सेवा’ कशी करू ?’’, असे विचारतात.
३. सरकारी अधिकार्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेले रखडलेले काम समजते. त्याला यातून संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळण्यात स्वारस्य असते. अशा वेळी सरकारी अधिकार्याला त्या व्यक्तीकडून लाच हवी असल्यास तो तिला म्हणतो, ‘‘मला तुमच्या कामात पैशांची अपेक्षा नाही. मी ‘सौजन्य’ म्हणून तुम्हाला साहाय्य करत आहे.’’ त्या वेळी सरकारी अधिकारी ‘सौजन्य’ या शब्दांचा उपयोग लाच मागण्यासाठी करत असते.
वरील विषय समजल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०२३)