मालाड (मुंबई) येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका मुलाचा मृत्यू !
मुंबई – मालाड येथील दिंडोशी येथील जामऋषीनगर परिसरातील झोपडपट्टीला १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली. यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, असून १०-१२ जण घायाळ झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे प्राथमिक अनुमान आहे. या आगील अनुमाने ५० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये याच ठिकाणी लागलेल्या झोपडपट्टीमध्ये आग लागून ७ जणांचा मृत्यू झाला होता.