तुर्कीयेमध्ये भारतीय श्वानपथकामुळे ६ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले !
अंकारा – तुर्कीयेमध्ये विनाशकारी भूकंपानंतर तेथे भारताने साहाय्यता कार्य करणारे एन्.डी.आर्.एफ्. सैनिक आणि श्वान पथक पाठवले आहे.
तुर्की और सीरिया में आया था भयावह भूकंप, इसी बीच भारतीय NDRF टीम ने बचाई बच्ची की जान. देखें वीडियो #TurkeyEarthquake #Turkey #Earthquake https://t.co/xdFHANsDuV
— DNA Hindi (@DnaHindi) February 9, 2023
देशातील नुरदागी परिसरात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचा ढिगारा हटवतांना तेथे एन्.डी.आर्.एफ्.चे श्वानपथकही उपस्थित होते. ढिगार्याखाली जिवंत व्यक्ती असल्यास ती अचूकपणे हेरण्याचे प्रशिक्षण या श्वानांना दिलेले असते. ढिगारा हटवतांना विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर ‘रोमिओ’ आणि ‘ज्युली’ नावाचे श्वान भुंकू लागले. त्यामुळे एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना सूचना मिळाल्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगत त्या ठिकाणी खोदकाम चालू केले. खोदकाम केल्यानंतर त्यांना ६ वर्षांच्या मुलीला या ढिगार्याखालून जिवंत बाहेर काढले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या श्वानांचे कौतुक केले आहे.