विनोदी कलाकार तन्मय भट यांचा सहभाग असणारे विज्ञापन ‘कोटक महिंद्रा बँके’ने घेतले मागे !
|
नवी देहली – यू ट्यूब व्हिडिओ प्रसारित करणारे आणि विनोदी कलाकार तन्मय भट हे ‘कोटक महिंद्रा बँके’च्या एका विज्ञापनामध्ये दिसत होते. आता त्यांना यातून काढण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांतून बँकेकडे तन्मय भट यांनी हिंदु धर्माचा अवमान करणे आणि लहान मुलांच्या अश्लील चित्रपटांना प्रोत्साहन देणे यांविषयीची माहिती पाठवण्यात आली होती. त्यानंतर बँकेने तिचे विज्ञापन मागे घेतले आहे. तन्मय भट यांनी श्री गणेशावरही आक्षेपार्ह विधान करणारे ट्वीट केले होते. तसेच त्यांच्यावर बालकांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.
Kotak Mahindra Bank withdraws ad campaign featuring controversial AIB comedian Tanmay Bhat after backlashhttps://t.co/m1uj74wXvs
— OpIndia.com (@OpIndia_com) February 13, 2023
१. विज्ञापनानंतर अनेकांनी या बँकेतील त्यांची खाती बंदही केली होती, तर काही जणांनी बंद करणार असल्याचे सामाजिक माध्यमांतून घोषित केले होते. याचाही परिणाम होऊन बँकेने वरील निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
२. बँकेने ट्वीट करून याविषयी सांगितले की, आमची बँक एखादी व्यक्ती किंवा समूह यांना हानी पोचवणार्या कोणत्याही विचारांचे समर्थन करत नाही. त्यामुळे आम्ही आमचे विज्ञापन मागे घेतले आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ? |