आरे परिसरात हिंदूंच्या मोर्च्यात पोलिसांचा लाठीमार
मुंबई – येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राममंदिराच्या शेजारी कब्रस्तानला जागा देण्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार केला. मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी भगवे ध्वज आणि फलक घेऊन येथे आले होते.
या वेळी पोलिसांनी हिंदूंना आरे परिसरात जाण्यास बंदी घातली. पोलिसांनी लाठीमार चालू केल्यावर कार्यकर्तेही आक्रमक झाले. पोलिसांनी या आंदोलनाला अनुमती नाकाराली होती.