पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन
पोहरादेवी (वाशीम) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी, नगारा भवन येथे ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ५० कोटी देण्याचीही घोषणा या वेळी केली. बंजारा समाजासाठी बंजारा महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बंजारा समाजाला संबोधित केले. संत सेवालाल महाराज यांचा २१ फूट उंच पंचधातूचा भारतातील एकमेव अश्वारूढ पुतळा आणि १३५ फूट उंच धवल रंगातील सेवाध्वज यांचे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले. माता जगदंबादेवी मंदिर, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन त्यांनी या वेळी घेतले.