‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन जीवनाचे सार्थक झाले’, असा भाव असलेल्या मानवत, जिल्हा परभणी येथील सौ. अश्विनी रुद्रकंठवार !
‘९ ते २७.४.२०२२ या कालावधीत मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते.
१. मी रामनाथी आश्रमात आल्यावर मला भूवैकुंठात आल्यासारखे वाटले.
२. मला आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘येथे पंचतत्त्वे कार्यरत आहेत’, असे मला जाणवले.
३. ‘चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगे रामनाथी आश्रमात सामावली आहेत’, याची अनुभूती येणे : अनेक जण चारधाम यात्रा करायला किंवा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला जातात; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला ‘चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगे रामनाथी आश्रमात सामावली आहेत’, याची अनुभूती आली.
४. आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. मला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.’
– सौ. अश्विनी रुद्रकंठवार, मानवत, जिल्हा परभणी. (२६.४.२०२२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |