कॅनडात आढळलेली उडणारी वस्तू अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पाडली !
ओटावा – कॅनडातील युकॉन प्रांतात उडणारी वस्तू आढळली. अमेरिकेच्या लढाऊ विमानाने ही वस्तू पाडल्याची माहिती पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिली. २ दिवसांपूर्वी अमेरिकेतील अलास्का येथेही अशीच वस्तू पहायला मिळाली. त्यानंतर २० सहस्र फूट उंचीवर जाऊन अमेरिकेच्या लढाऊ विमानाने ही वस्तू पाडली होती.
The U.S. believes the unidentified objects shot down by American fighter jets over Canada and Alaska were balloons, though smaller than the China balloon downed over the Atlantic Ocean last weekend, Senate Majority Leader Chuck Schumer said Sundayhttps://t.co/hziqWmrOoD
— Eyewitness News (@wchs8fox11) February 12, 2023
मागील ३ दिवसांत आकाशात संशयास्पद वस्तू दिसण्याची ही तिसरी घटना आहे.
A U.S. Air Force F-22 fighter jet shot down an unidentified cylindrical object over Canada, the second such incident in as many days. https://t.co/f9O9UAhu4y
— Defence Today (@DefenceToday) February 12, 2023
जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले, ‘मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी बोललो. त्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या साहाय्याने ही वस्तू पाडण्यात आली. कॅनेडियन सैन्य लवकरच या वस्तूचे अवशेष जप्त करून त्याची पडताळणी करील.