हिंदु राष्ट्राची स्थापना, हा धार्मिक उन्माद नाही ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक
सभेला २ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
पनवेल – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरािगणी शाखेच्या मुंबई समन्वयक डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे अन् सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुरोहित सर्वश्री आदित्य दुबे, सुशील उपाध्याय, रविरंजन तिवारी यांनी वेदमंत्रपठण केल्यावर सभेला प्रारंभ झाला. श्री. सुनील कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन श्री. प्रसाद वडके यांनी केले. या वेळी भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे या पक्षांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, उद्योजक, अधिवक्ता, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी वेळ देण्याचा पनवेलकरांनी निर्धार केला.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून उपासनेची शक्ती वाढवा ! – अभय वर्तक, प्रचारक, सनातन संस्था
आज भारतभरातील हिंदू हिंदु राष्ट्राची मागणी का करत आहेत ? हिंदूंच्या गेल्या अनेक पिढ्यांनी खस्त्या खाल्ल्या, त्यामुळे हिंदू आज जागृत झाला आहे. सरकारी अनुदानित शाळांत धार्मिक शिक्षणाला अनुमती नाही; मात्र अल्पसंख्यांच्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जात आहे. आज इंग्रजी येत नाही म्हणून जगातील कुठल्याही देशाचे काही अडत नाही. मंदिराचा पैसा वापरण्यासाठी सरकारने ती कह्यात घेतली आहेत. आज धर्म तुमचा वेळ मागत आहे. भारतातील १०० कोटी हिंदू रस्त्यावर उतरतील तेव्हा हिंदु राष्ट्र येईल; मात्र हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंच्या संघटनशक्तीसमवेत आध्यात्मिक सामर्थ्याचीही आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदूंनी उपासनेची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक हिंदु स्त्रीने धर्माचरणासमवेत स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे
देव, देश आणि धर्म यांसाठी स्त्रीशक्तीचे योगदान प्रत्येक युगात लाभले आहे. कलियुगात मात्र याच मातृशक्तीला स्वतःच्या रक्षणासाठी लढावे लागत आहे. आजच्या धर्मनिरपेक्ष भारतात स्त्री सुरक्षित नाही, हे सत्य आहे. असे असले, तरी प्रत्येक आव्हान पेलणारी अंतःप्रेरणा अद्यापही आपल्या धमन्यांमधून वहात आहे, हे स्त्रियांनी विसरू नये. लव्ह जिहादसारखी संकटे आज हिंदूंच्या मूळावर उठली आहेत. ती परतवून लावण्यासाठी हिंदु स्त्रियांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन धर्माचरणासमवेत स्वरक्षण प्रशिक्षण घेणेही आवश्यक आहे.
इस्लामी, ख्रिस्ती, धर्मनिरपेक्ष कि हिंदु राष्ट्र हवे ?, हे ठरवण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
भारतात १४ टक्के मुसलमानांच्या मागणीसाठी ८० टक्के हिंदु समाजाला सक्तीने हलाल उत्पादने विकली जात आहेत. भारतियांची वंशपरंपरागत भूमी वक्फ कायद्याच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात हडप केली जात आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे जिहाद्यांचे षड्यंत्र आहे. औरंगजेब, अफजलखान यांचे उदात्तीकरण थांबवल्याखेरीज खरा इतिहास लक्षात येणार नाही. प्रत्येक गड-किल्ला इस्लामी अतिक्रमणमुक्त झाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही. इतिहासद्रोह करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी कायदे करायला हवेत. दीड-दोन वर्षांच्या काळात १ लक्ष हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले. त्यासाठी हिंदु धर्मप्रचारक सिद्ध होणे आवश्यक आहे. ही सारी संकटे हिंदु धर्माला नष्ट करू पहात आहेत. आता आपल्याला इस्लामी, ख्रिस्ती, खलिस्तानी, धर्मनिरपेक्ष कि हिंदु राष्ट्र ? हे ठरवण्याची निर्णायक वेळ आली आहे !
मुंबई मुसलमानांच्या कह्यात गेली आहे ! – सावरकर
आज हिंदूंच्या उपासनेवर गदा आणली जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आहे. मुंबईसह भारतात ५ सहस्र छोटे पाकिस्तान आहेत. मुंबई मुसलमानांच्या कह्यात गेली आहे. दादर येथे रस्त्यालगत टॅक्सीचालक, भंगारवाले, इलेक्ट्रीकचे काम करणारे, सुतार हे बहुसंख्येने मुसलमान आहेत.
वर्ष १९४७ मध्ये जी चूक झाली, ती वर्ष २०४७ मध्ये पुन्हा होऊ देऊ नका ! – रणजित सावरकर
भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, असा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांनीही याचा पुरस्कार केला. आजही तोच इतिहास आपणाला शिकवला जात आहे. महाभारत ५ सहस्र वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळी भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला ३०० पिढ्यांचा इतिहास सांगितला. याला वैज्ञानिक आधार असतांना हिंदूंचा हा दैदिप्यमान इतिहास दडपून टाकला जात आहे. राष्ट्राचा इतिहास दडपून टाकला, तर राष्ट्राभिमान नष्ट करता येतो, ही इंग्रजांची कुटनीती होती. हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना करतांना भारताचा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायला हवा. धर्मांधतेचा उन्माद आणि लुटीची लालसा यांमुळे जगातील अनेक सत्ता नष्ट झाल्या आहेत. भारतालाही त्याचा फटका बसला. जी चूक वर्ष १९४७ मध्ये झाली, ती चूक वर्ष २०४७ मध्ये पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.
वंदनीय उपस्थिती !
जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टचे पू. प्रमोद केणे महाराज, वेदविद्या गुरुकुलम् वारियर फाऊंडेशनचे प्राचार्य वेदमूर्ती श्री. विष्णुप्रसाद गौतम, ह.भ.प. गणेश महाराज पाटील, ह.भ.प. पुंडलिक महाराज फडके, संत तुकाराम महाराज कोकण दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. पद्माकर महाराज पाटील, ह.भ.प. पद्माकर महाराज पाटील, षड्विकार निर्मूलन सप्ताहाचे सचिव ह.भ.प. परशुराम वाघमारे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. रामदास महाराज चौधरी आणि कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, होप इंडियाचे अध्यक्ष प्राचार्य ऋषी वरदानंद, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव