हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करणे आवश्यक ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
रा.स्व. संघाने आयोजित केलेल्या बस्ती संमेलनामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
धनबाद (झारखंड) – आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करण्यासाठी अभियान चालवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केले. येथील ठाकूरकुलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बस्ती संमेलनामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला संघाचे सर्वश्री गौतम सिंह, अशोक, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.