बांगलादेशात अल्लाचा कथित अवमान केल्यावरून हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास !
ढाका (बांगलादेश) – फेसबुकवरून अल्लाचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बांगलादेशातील रंगपूर सायबर लवादाने परितोष सरकार या हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास आणि ३० सहस्र टका (बांगलादेशी चलन), म्हणजे २३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याला एकूण ४ शिक्षा सुनावण्यात आल्या. त्यात त्याला अनुक्रमे १, २, ३ आणि ५ वर्षांचा कारावास ठोठावला. ही एकूण ११ वर्षे होत असली, तरी ती एकत्रित भोगायची असल्याने परितोष याला एकूण ५ वर्षे कारावासात रहावे लागणार आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये फेसबुकवरून परितोष यांनी एक कथित आक्षेपार्ह चित्र प्रसारित केले होते. यानंतर जिहाद्यांनी परितोष यांच्या गावावर आक्रमण करून जाळपोळ केली होती. आक्रमणासाठी धर्मांधांना मशिदीवरील भोंग्यांवरून आवाहन करून बोलावण्यात आले होते. (मशिदीवरील भोंग्यांचा असाही वापर होतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतात कधी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यावरून कुणाला शिक्षा होते का ? |