मदनी यांची चिथावणी !
भारत ही अल्लाचे पहिले पैगंबर बशर सईदाला आलम यांची भूमी आहे. भारत मुसलमानांची पहिली मातृभूमी आहे. यामुळे ‘इस्लाम बाहेरून आला’, असे म्हणणे चुकीचे आणि आधारहीन आहे. भारत हिंदी मुसलमानांसाठी सर्वांत चांगला देश आहे. मुसलमानांविषयी द्वेष आणि चिथावणी यांची प्रकरणे अन् इस्लामद्वेष यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, अशी विधाने ‘जमीयत-उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख महमूद मदनी यांनी केली आहेत. याच कार्यक्रमात अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला एकच आहेत’, असे विधान केले. या विधानाचा निषेध जमीयतच्या व्यासपिठावर उपस्थित असलेल्या जैन मुनींनी केला आणि ते कार्यक्रमातून निघून गेले.
भारतियांची दिशाभूल
महमूद मदनी हे मुसलमानांच्या जगातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या विधानांना मुसलमान गांभीर्याने घेतात. मदनी यांनी केलेली विधाने पहाता त्यांचा रोख सरळसरळ भारत कह्यात घेण्याकडेच वळतो आहे, असे दिसते. तसेच त्यांच्या विधानांमध्ये अंतर्विरोधही आहे, असे लक्षात येते. ‘भारतात हिंदु धर्म सर्वांत प्राचीन आहे’, हे वेद, उपनिषदे, पुराणे यांवरून लक्षात येते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता चालू असलेले कलियुग या ४ युगांची वर्षे किती आहेत ? कोणत्या देवतेचा अवतार कोणत्या युगात झाला ? याचेही उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आहेत. ‘इस्लामची स्थापना मक्का-मदिना येथे १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी प्रेषित महंमद पैगंबर यांच्या माध्यमातून झाली’, असे आतापर्यंत सर्वांना ठाऊक होते. त्यात मदनी यांनी ‘भारत ही पहिल्या पैगंबरांची भूमी आहे’, असे सांगणे, ‘इस्लाम भारतातील ४ प्राचीन धर्मांपैकी सर्वांत जुना धर्म आहे’, असे सांगणे, ‘इस्लाम बाहेरून न येता येथीलच धर्म आहे’, असे सांगणे हे सर्वच धक्कादायक आहे. त्याही पुढे ‘भारतात मुसलमानांविरुद्ध द्वेष पसरवला जातो आणि चिथावणी दिली जाते’, असे म्हणणे हे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असेच झाले. भारतात कुणाकडून कुणाच्या हत्या होत आहेत ? लव्ह जिहादमध्ये हिंदु मुलींना फसवून त्यांच्या क्रूर हत्या कोण घडवत आहे ? हिंदूंना त्यांच्या रहात्या घरात छळ करून घर सोडून जाण्यास कोण बाध्य करत आहे ? याची भारतातील बहुसंख्य हिंदूंना पुरती कल्पना आहे.
असुरक्षित हिंदू
हिंदूंच्या मिरवणुका, मंदिरांचे उत्सव यांच्यावर धर्मांधांकडून दगडफेक केली जाते. हिंदूंच्या विरुद्ध दंगली घडवून हिंदूंची घरेदारे, दुकाने यांची राखरांगोळी केली जाते. बहुसंख्य हिंदूंच्या देशात मग कोण असुरक्षित आहे ? हे मदनी यांना पुरते ठाऊक आहे. देशात मुसलमान अल्पसंख्य असूनही ते त्यांना हवे ते, हवे तेव्हा करू शकतात. ‘व्होट बँके’द्वारे सरकारवर दबाव टाकू शकतात. सर्वाेच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकावरून ५ वेळा अजान न देण्यास सांगूनही येथे प्रत्येक मशिदीवरून ती दिली जाते आणि हिंदूंना ती निमूटपणे ऐकावी लागते, तसेच विरोध केल्यास ‘असहिष्णु’ असा शिक्का हिंदूंवर मारला जातो. त्यामुळेच मदनी ‘भारत हिंदी मुसलमानांसाठी सर्वांत चांगला देश आहे’, असेही मान्य करतात, म्हणजे त्यांना येथील मुसलमानांसाठी अनुकूल परिस्थितीही हवी आहे, तसेच हिंदूंवर खोटे आरोप करून जगात हिंदूंची ‘मुसलमानद्वेषी’ अशी ओळख करून अपकीर्तीही करायची आहे. आता हिंदूंची संख्या अधिक असल्याने ते ‘भारत जसा मोहन भागवत यांचा तसाच तो आमचाही आहे’, असे सांगतात. काही दिवसांनी ते ‘भारत हा केवळ मुसलमानांचाच देश आहे’, असे सांगण्यास अल्प करणार नाहीत.
मंदिरे तोडणे योग्य ठरवणे ?
काही दिवसांपूर्वी ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे महंमद साजिद रशिदी यांनी ‘सोमनाथ मंदिर तोडून महंमद गझनीने कोणतीही चूक केली नाही. तेथे अयोग्य गोष्टी चालू होत्या म्हणून मंदिर तोडले’, असे सांगितले.
त्यापूर्वी याच रशिदी महाशयांनी ‘५० वर्षांनी आमच्या पिढ्या राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधतील’, असेही प्रक्षोभक विधान केले. रशिदी यांच्या या चिथावणीखोर विधानांविषयी कोणताही मौलाना अथवा त्यांच्यातील अन्य धार्मिक नेत्याने निषेध केल्याचे ऐकण्यात आले नाही. मुसलमानांचे नेते अशा प्रकारे परस्परविरोधी विधाने करून मुसलमानांना चिथावणी देत आहेत आणि भारतातील शांतता भंग करत आहेत. त्यांच्याविषयी पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेणार आहेत ? कि मोठी घटना होण्याची वाट पहात बसणार आहेत ? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. शांतीप्रिय हिंदु समाज या इस्लामी कट्टरवादी नेत्यांच्या विधानांमुळे असुरक्षितता अनुभवतो.
धर्मांधांचा खोटेपणा
हिंदूंनी मुसलमानांकडून होणार्या अत्याचारांविषयी आवाज उठवल्यावर सातत्याने ‘गंगा जमुनी तहजीब’चे (हिंदु आणि मुसलमान यांच्यात कथित बंधुत्व जोपासण्याच्या संकल्पनेचे) हिंदूंना स्मरण करून दिले जाते. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाला, त्याविषयी आताच्या पिढीतील काश्मिरी पंडितांनी आवाज उठवला, तर त्यांना ‘तुम्ही ‘काश्मिरीयत’ दाखवत नाहीत’, असे सुनावले जाते. सर्वसाधारण बोलतांना ‘हिंदूंनी भाईचारा दाखवला पाहिजे’, असे सांगितले जाते. यातून ‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, असे धर्मांधांना अपेक्षित आहे’, हे लक्षात येते. ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मदनी यांच्या विधानावर ‘देश आता कणखर हातांमध्ये आहे’, असे म्हटले आहे. ते मौर्य यांनी प्रत्यक्षात दाखवून हिंदूंना आश्वस्त करावे, ही अपेक्षा !
धर्मांध नेत्यांच्या धमक्यांना शासनकर्त्यांनी गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि हिंदूंना आश्वस्त करावे, ही अपेक्षा ! |