साधकांकडे सूक्ष्मातून पूर्ण लक्ष ठेवून त्यांची काळजी घेणारे प.पू. दास महाराज !
पर्वरी, गोवा येथील सौ. समृद्धी संतोष गरुड यांना प.पू. दास महाराज यांच्याविषयी आलेली अनुभूती त्यांनी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. प.पू. दास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ही अनुभूती येथे देत आहे.
१. प.पू. दास महाराज यांनी मुलगा कु. योगेश्वरसाठी (आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १० वर्षे) उपाय सांगून ‘त्याला २१ दिवस शाळेत पाठवू नकोस’, असे सांगणे
‘४.९.२०२२ या दिवशी माझा मुलगा कु. योगेश्वर (आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १० वर्षे) याला सर्दी होऊन ताप आला. त्यामुळे त्याला २ दिवस शाळेत पाठवले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी मला प.पू. दास महाराज यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी योगेश्वरच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांना ‘योगेश्वरला ताप आला आहे’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी योगेश्वरसाठी आध्यात्मिक उपाय सांगून ‘योगेश्वरला २१ – २२ दिवस शाळेत पाठवू नकोस’, असे २ – ३ वेळा सांगितले.
२. आधुनिक वैद्यांनीही ‘मुलाला २१ दिवस शाळेत पाठवू नये’, असे सांगणे
योगेश्वरला दोन दिवसांनी थोडे बरे वाटू लागले; म्हणून त्याच्या बाबांनी (श्री. संतोष गरुड यांनी) त्याला शाळेत पाठवले. त्या दिवशी दुपारनंतर त्याला पुन्हा ताप आला. त्यामुळे त्याला आधुनिक वैद्यांकडे न्यावे लागले. त्याचे हात आणि पाय यांवर आलेले उष्णतेचे फोड पाहून (तांदळी, हँड-फूट माऊथ इन्फेक्शन) ‘२१ दिवस त्याला शाळेत पाठवू नका’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. प.पू. दास महाराज यांनी आधीच दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व घडले.
गुरुरूपाने सूक्ष्मातून सतत समवेत राहून काळजी घेणार्या आणि वेळीच सावरणार्या प.पू. दास महाराज यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. समृद्धी संतोष गरुड (कु. योगेश्वरची आई), पर्वरी, गोवा. (२२.१.२०२३)