‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा
‘इस्लामचा अर्थ केवळ नमाजपठण करणे, हा आहे. इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल ते करा. असेच ख्रिस्ती धर्मातही आहे. चर्चमध्ये मेणबत्ती पेटवली की, सर्व पापे धुतली जातात, अशी विधाने योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे एका कार्यक्रमात केली. ‘कुराण आणि बायबल यांमध्ये मात्र असे काहीही शिकवले जात नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. बाडमेर (राजस्थान) येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
योगऋषी रामदेवबाबा यांनी मांडलेली सूत्रे
१. पाच वेळा नमाजपठण केल्यानंतर ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळते. जन्नतमध्ये मद्य आणि अप्सरा मिळत असतील, तर अशी ‘जन्नत’ ‘जहन्नुम’पेक्षा (नरकापेक्षा) वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२. कुणी संपूर्ण जगाला इस्लाममय करण्याच्या गोष्टी करतो, तर कुणी जग ख्रिस्तमय करण्याचे सांगतो. काही जण मिशा काढून टाकतात आणि गोल टोपी घालतात. हा मूर्खपणा आहे. लोक याच विचारात राहून सर्व जगाला इस्लाममय करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ (४.२.२०२३)